Noida School Closed:  दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे.  ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. दिल्लीनंतर नोएडातही लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली आहे.  शाळा, कॉलेज बंद ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात  राज्य सरकारची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत आहे. यामुळे सराकारने तातडीने काही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे. नोएडामध्ये सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 616 इतका नोंदवला गेला. वाढत्या प्रदूषणाची पातळी विचारात घेता कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा चौथा टप्पा अर्थात GRAP दिल्ली-NCR मध्ये लागू केला आहे.


शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश


मागील दोन दिवसांत दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरीदाबादसह एनसीआरच्या सर्व भागात प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. विषारी हवेमुळे दिल्ली एनसीआरमधील लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डोळ्यात जळजळ होणे आणि घसा खवखवणे अशा तक्रारींचा सामना करावा लागत आहे. नारीकांच्या आरोग्याचा गांभीर्गायाने विचार करत सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा तात्काळ बंद करण्याच्या आदेश जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत शाळा प्रशासनाने ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवावे अशा सूचना केल्या आहेत.  प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.  तर 6 वी ते 12वीपर्यंतच्या शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग घेण्यात येणार आहेत.  अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगावे असे देखील आदेश दिले आहेत. यासंदर्भात एक परित्रक दिल्ली सरकारने जारी केले आहे.  


वायू प्रदूषण रोखण्यासाठी सम-विषम क्रमांक वाहन योजना लागू


दिल्लीत वायू प्रदूषण रोखण्यासाठी सम-विषम क्रमांक वाहन योजना लागू केलीये. दिल्ली शहरात 13 ते 20 नोव्हेंबरदरम्यान सम आणि विषम नोंदणी क्रमांकाच्या वाहनांना 1 दिवसाआड वाहतुकीची मुभा असेल दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केलीये.


नागरिकांनी घराबाहेर पडताना एन-95 मास्कचा वापर करावा


दिवाळीपूर्वीच यंदा नागरिकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावतायत. वायू प्रदूषणामुळे खोकला, घशातील खवखव, श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना एन-95 मास्कचा वापर करावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्यात. प्रदूषणाच्या गुणवत्तेचा स्तर इतका वाईट आहे की त्याने धोकादायक पातळी गाठलीय त्यापासून संरक्षणासाठी रुमाल किंवा स्कार्फ निरुपयोगी ठरत असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलंय. लहान मुलं, वृद्ध, गरोदर स्त्रिया तसंच रस्त्यावर काम करणा-यांनी विशेष काळजी घ्यावी असंही आरोग्य विभागाने म्हटलंय.