कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने या राज्यात लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवला
कोरोनाचा संसर्ग सुरुच असल्याने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे कर्नाटकात लागू असलेला लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आला आहे. 7 जून रोजीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.
राज्यात 7 एप्रिल पासून निर्बंध
7 एप्रिलपासून कर्नाटकात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. पण कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने आणि मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
"येदियुरप्पा यांनी म्हटलं की, "आम्ही मुख्य सचिव आणि डॉक्टरांनी चर्चा केल्यावर लॉकडाऊन संदर्भात काही निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये 7 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
येदियुरप्पा यांनी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.