लॉकडाऊन : `या` राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी
कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.
रांची : कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बाबींवर निर्बंध आले आहेत. अनेक उद्योग-धंदे बंद आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकान सोडता अन्य दुकाने बंद आहेत. दरम्यान, झारखंड राज्याने लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता दिली आहे. अनलॉक-१मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर आता चप्पल आणि कापडाची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही अटींच पालन करावे लागणार आहे.
झारखंड राज्यात चप्पल आणि कपड्याची दुकाने शहरी भागात उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाब संबंधितांना सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. कोरोना विषाणूबाबत जे काही नियम आहेत, त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री सोरेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
झारखंड राज्यात आजपासून शहरी भागात चप्पल आणि कपड्याची दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यातआली आहे. लोकांनी खरेदीसाठी जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. ज्या काही गाईडलाइन्स आहेत, त्या पाळल्या पाहिजेत. मास्क आणि सॅनिटायझर याचा उपयोग केला पाहिजे. तसेच सोशल डिस्टेन्सिंगचेही पालन करणे गरजे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री सोरेन यांनी संबंधिताना सूचना केल्या आहेत.