भोपाल : लग्नानंतर प्रत्येक व्यक्ती सुखी संसार थाटण्याचे स्वप्न पाहातो. प्रत्येकाला असं वाटंत असतं की आपलं छोटं कुटुंब असावं, प्रेम करणारा जोडीदार असावा. जो आपल्या सुख-दुखात आपली साथ देईल. परंतु जर एक जरी जोडीदाराने साथ सोडली तर संसाराची गाडी पुढे जात नाही. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशातील एका तरुणासोबत घडला आहे. या तरुणाला लॉकडाऊनमध्ये जुळलेलं प्रेम महागात पडलं आहे. त्याला तो नुसताच महागात पडला नाही, तर तो यामुळे रस्त्यावर आला आहे. या तरुणाला आपल्या बायकोच्या प्रेमापुढे काहीही दिसलं नाही. तो तिला घेऊन हनीमूनला गेला, जेथे त्याने लाखो रुपये बायकोवर खर्च केले. परंतु एवढं आंधळं प्रेम करुन देखील त्याच्या बायकोनं त्याला धोका दिलाच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर लॉकडाऊन काळात या महिलेनं प्रेयसी बनून प्रियकराला जाळ्यात अडकवले. त्यानंतर लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन ती पळून गेली. हे संपूर्ण प्रकरण महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसमा गावातील आहे. पीडित अखिलेश नायक याने एसपी कार्यालय गाठून तक्रार अर्ज दिला.


त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची बायको लग्नानंतर लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन फरार झाली.


अखिलेश यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी जेव्हा पहिला लॉकडाऊन लागू झाला, तेव्हा तो उषा पाल या महिलेच्या प्रेमात पडला होता. उषा पालची छतरपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर चहाची टपरी होती.


अखिलेश तेथे मॉर्निंग वॉकसाठी जायचा. ज्यानंतर हे दोघे प्रेमात पडले. दोन वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी कोर्टात जाऊन त्या दोघांनी लग्न देखील केलं.


लग्नानंतर प्रेयसीला फिरवण्यासाठी अखिलेशने लाखो रुपये खर्च केले आणि हनीमूनला घेऊन गेला. यासाठी त्याने आपली जमीन देखील विकली. बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे अखिलेशने ठरवले होते. परंतु त्याची बायको असा त्याचा खेळ करेल, असा त्याने स्वप्नात देखील विचार केला नसावा.


लुटेरी दुल्हन, उषा पाल

पीडित अखिलेशने पुढे पोलिसांना सांगितले की, 'काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरू होते. त्यानंतर माझी बायको उषा हिने माझ्याकडे काही दागिन्यांची मागणी केली. त्यानंतर मी तिला सोन्याची चेन, कानातले आणि इतर काही वस्तूही बनवून दिल्या. तसेच गावातील बँकेत माझे दोन लाख रुपये जमा होते, तेही बाहेर काढून मी घरी ठेवले. त्यानंतर एक दिवस मला बायकोनं दुकानातुन काही वस्तु आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर मी जेव्हा घरी आलो, तेव्हा ती घरी नव्हती."


रात्रभर वाट पाहून देखील बायको घरी आली नाही हे पाहून अखिलेशने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिस तपासात हे समोर आले आहे की, उषाचे आधिच लग्न झाले आहे आणि तिला मुलं देखील आहेत. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.