हैदराबाद: कोविड -१९ मुळे लॉकडाऊन आणखी वाढलं तर येणाऱ्या काळात आयटी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. असे नॅसकॉमचे माजी अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांचे मत आहे. चंद्रशेखर म्हणाले की, वर्क फ्रॉम होम ही सकारात्मक बाब आहे. यामुळे आयटी कंपन्यांसाठी नवीन मार्ग खुले होतील आणि त्यांची गुंतवणूक वाचणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर सद्यास्थिती आणखी बिकट झाली तर स्टार्टअप्ससाठी अडचणी येऊ शकतात. उद्यम भांडवलदारांच्या निधीतून स्टार्टअप कंपन्या सुरू आहेत. मोठ्या कंपन्या दोन कारणांमुळे नोकरीवर लोकांना नाही काढणार, एकतर त्यांना आपला कर्मचारी गमावायचा नाही. दुसरे म्हणजे, कर्मचार्‍यांना देण्यासाठी निधीची त्यांच्याकडे कमतरता नाही.


चंद्रशेखर म्हणाले की, जरी काही मोठ्या कंपन्यांनी कपात केली तरी ते तात्पुरते किंवा इंटर्न कर्मचारी काढून टाकतील. जोपर्यंत या कंपन्यांकडे पैसे आहेत  तोपर्यंत ते नियमित आणि कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना काढणार नाहीत.


चंद्रशेखर यांनी म्हटलं की, ही परिस्थिती किती काळ टिकेल यावर अवलंबून असेल. एक महिना, दोन महिने किंवा तीन महिने. त्यानंतर या कंपन्याही दबावाखाली येतील. कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सबसिडी देणे सुरू ठेवू शकत नाहीत. चंद्रशेखर यांनी पीटीआयला सांगितले की अशी परिस्थिती किती दिवस टिकते हा प्रश्न आहे.


ते म्हणाले की जगातील अनेक देशांत कर्मचारी घरातून काम करत आहेत. अल्पावधीतच याचा उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. परंतु भविष्यात ही गोष्ट भविष्यात इतका बदल घडवून आणेल, जो भारतातील आयटी कंपन्यांनी अद्याप अनुभवलेला नाही.


चंद्रशेखर म्हणाले की, भविष्यात वर्क फ्रॉम होममुळे कर्मचार्‍यांची उत्पादकता, लॉजिस्टिक्स खर्च आणि कार्यालयाची जागा वाचणार आहे.