नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच त्यांचे सहकारी लालकृष्ण आडवाणी यांचा नव्हता. तसेच तो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचाही नसेल असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. भाजपा हा व्यक्तीकेंद्री पक्ष असल्याचा आरोप वारंवार केला जातो. गडकरींनी या आरोपाचे खंडन करत त्याला अशा शब्दात उत्तर दिले. भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून भाजपा मोदी केंद्रीत झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदिरा इज इंडीया एंड इंडिया इज इंदीरा या धर्तीवर मोदी हे भाजपा आणि भाजपा हे मोदी अशी परिस्थिती आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमच्या पार्टीत परिवार राज होऊ शकत नाही. मोदी केंद्रीत भाजपा ही धारणा चुकीची असल्याचे गडकरी म्हणाले. पार्टीचे मंत्री मंडळ सर्व निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. 



लोकसभा निवडणुकीत आपण केलेल्या कामांविषयी सांगण्या ऐवजी राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा हे निवडणुकीचे मुद्दे बनवण्यात आल्याचा आरोप भाजपावर होत आहे. यावरही गडकरींनी उत्तर दिले. निवडणुकीत जातीयवाद आणि सांप्रदायिकते विष कालवण्याचे काम विरोधकांनी केले आहे. पण जनता विकासासोबत असल्याचे गडकरी म्हणाले. राष्ट्रवाद हा आमच्यासाठी मुद्दा नाही तर आमचा आत्मा असल्याचे गडकरी म्हणाले. शासन, प्रशासन आणि विकास हे आमचे उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. पीडित आणि मागास यांना केंद्रबिंदु मानून अन्न, वस्त्र आणि निवारा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याचेही गडकरींनी सांगितले.