नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पार्टीने आपले संकल्प पत्र जारी केले आहे. भाजपाने आपल्या संकल्प पत्रामध्ये शेतकरी, राम मंदिर, तिहेरी तलाक या मुद्द्यांवर भर दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा नितीवर भर दिला आहे. जम्मू आणि काश्मीर ला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 35 A बद्दल भाजपाच्या संकल्प पत्रात मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 35 A कलम रद्द करणार असल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आम्ही कलम 35A संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. जम्मू आणि काश्मीरला लागू होणारे 35 A कलम हे स्थानिक नसलेल्या तसेच महिलांवर भेदभाव करणारे आहे. हे कलम म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विकासात बाधा आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुरक्षित आणि शांतीपूर्ण वातावरण देण्यासाठी आम्ही सर्व पाऊले उचलू असेही भाजपाच्या संकल्प पत्रात म्हटले आहे. आम्ही काश्मीरी पंडीतांच्या सुरक्षिततेसाठीही प्रयत्न करणार असल्याचेही यात म्हटले आहे.



पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे :


- ३ वर्षांनी २०२२ मध्ये केलेली कामं देशासमोर ठेवू 


- देशातील तरुणांना योग्य संधी मिळण्यासाठी मोठं लक्ष्य घेऊन जात आहोत.


- राजकीय आणि शासकीय व्यवस्थेत जी नकारात्मकता आहे. त्या विरोधात निर्णय़ घ्यायचा आहे. सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करु.


- भ्रष्टाचारमुक्त होण्य़ाच्या दिशेने जाण्याचा संकल्प आहे.


- स्वच्छता एक जनआंदोलन झालं आणि त्यामुळे अभियान यशस्वी झालं. त्यासाठी मिडिया हाऊस आणि तरुणांचे आभार मानतो. हे कोणत्याही सरकारचं यश नाही. 


- भारतात विकासाला जनआंदोलन करायचं आहे.


- २०१४ ते २०१९ मध्ये केलेल्या कामांमध्ये सामान्य माणसासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी होत्या. 


- मच्छिमारांसाठी बजेटमध्ये एक वेगळ्या मंत्रालय़ाची घोषणा केली होती. पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आणि सगळ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना करु.


 - वन मिशन, वन डायरेक्शनने पुढे जाऊ.


- २०२२ ला भारताला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही ७५ संकल्प घेतले आहेत. महापुरुषांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करु.


- देशवासियांचा गेल्या ५ वर्षात जो सहयोग मिळाला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो