कोल्हापूर : काश्मीर हे संवेदनशील राज्य आहे. तिथला निर्णय घेत असताना तिथल्या लोकांच्या विचार करून घेण्याची गरज होती. पण नरेंद्र मोदींनी ते केलं नाही. त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे लोक नाराज आहेत. ती नाराजी लपविण्यासाठी मोदी अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बॅटिंग कोल्हापूरमधल्या पेठवडगावात पहायला मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शेट्टींचे प्रचार चिन्ह बॅट हातात घेऊन बॅट आणि त्यांचे नाते सांगितले. आणि त्यानंतर बॅटिंग केली. यावर उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांची दाद दिली. कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मोदी, भाजपावर टीका केलीय. दर दोन तीन दिवसांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन फक्त आपल्यावर टीका करत असल्याचेही पवार म्हणालेत. यावेळी पवारांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. मेहबुबा मुफ्ती आणि काही विधानाचा आधार  घेवून मोदी टीका करत होते.  मेहबुबा मुख्यमंत्री असताना भाजपाचे नेते हे मंत्री होते पण मोदी हे माझ्याकडून उत्तर मागतात असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सैनिकांना मोदी सेना असा उल्लेख केला असे म्हटलं आहे. अगदी दहा पैकी दोन लोकांनी जरी असे सांगितले असेल तर माझ्यामते ते  गंभीर आहे. राष्ट्रीय घातक प्रवृत्ती पराभूत केली पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतोय असेही पवार म्हणाले. 


राफेल बाबत मोदी सरकारकडून प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती देण्यात आली. संरक्षण राज्य  मंत्री भाबरे यांनी यांनीच राफेलची किंमत वेगळी असल्याच सांगितले. राजीव गांधी यांनी बोफर्स बद्दल चौकशी समिती नेमली होती.त्यावेळी विरोधकांची मागणी मान्य करण्यात आली. मग आत्ता का चौकशी समिती का नेमली जात नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 



शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला मान होता. पण आजचे नेते हवामान बदलेल तस विधान बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांना काल पर्यंत कळत होत पण आज त्यांना कळत नाही असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. प्रत्येक सभेमध्ये मोदी यांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केलं आहे. जे प्रेम व्यक्त केलंय; त्यावरून आमच बरं सुरू आहे असं मी समजतो असे शरद पवारांनी म्हटले.