नवी दिल्ली:  आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सर्वाधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचा खेळ शंभरीच्या आतच आटपेल, असा निष्कर्ष इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणातून पुढे आला आहे. या सर्वेक्षणानुसार रालोआ आघाडीला २७२ या मॅजिक फिगरपेक्षा तीन जागा अधिक मिळतील. केवळ भाजपच्यासंदर्भात बोलायचे झाल्यास त्यांचे संख्याबळ २७२ वरून २३० पर्यंत खाली येईल. मात्र, भाजप बहुमतासाठी कमी पडणाऱ्या ४२ जागांचे संख्याबळ रालोआतील घटकपक्षांच्या साथीने सहज भरुन काढेल. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ४४ जागांपर्यंत खाली घसरलेल्या काँग्रेसला यंदा ९७ जागांवर विजय मिळेल. यूपीए आघाडीचा विचार करायचा झाल्यास ते १४७ जागांपर्यंत मजल मारतील. तर अन्य पक्षांना १२१ जागा मिळतील. यामध्ये तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९ जागांवर विजय मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, लोकसभेसोबत होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करायचा झाल्यास ओडिशामध्ये बिजू जनता दल १४७ पैकी १०० जागा जिंकून सत्ता कायम राखेल. तर आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मोठी राजकीय उलथापालथ करु शकते. याठिकाणी वायएसआर काँग्रेसला १७५ पैकी १०० जागा मिळू शकतात, असा अंदाज या सर्वेक्षणाअंती वर्तवण्यात आला आहे. 


वायनाडमध्ये गांधी विरुद्ध गांधी; एकाच आडनावाच्या चार उमेदवारांमुळे संभ्रम


महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास ४८ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा भाजपला मिळतील. शिवसेना-भाजप युती ३४ जागांचा टप्पा गाठेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १३ जागा मिळतील व एक जागा अन्य पक्षाच्या खात्यात जाईल, असा अंदाज आहे.