नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. याअंतर्गत 59 जागांवर आज मतदान होत आहे. 8 राज्यातील साधारण 10.17 कोटी मतदार या टप्प्यातील 918 उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहे. पुढच्या चार दिवसात या सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल लागणार आहेत. तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. पण या निवडणूक निकालाचे अंदाज यायला सुरुवात झाली आहे. सट्टाबाजारानेही आगामी निवडणूकीबद्दल अंदाज स्पष्ट केले आहेत. सट्टाबाजाराने पुढील सरकार स्थापनेसाठी भाजपाला पसंती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एनडीएचे सरकार येईल असा अंदाज सट्टाबाजारात लावला जात आहे. भाजपाला २४४ ते २४७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपाच्या मित्रपक्षांना साधारणतः ४० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काँग्रेसला यावेळी ८०च्या आसपास जागा लागण्याची शक्यता सट्टा बाजाराने वर्तवली आहे. दुबईतून हा सट्टा बाजार या संबंधीच्या पैजा घेत असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत बहुमताचा दावा केला असला तरी पत्रकार परिषदेनंतर काही बुकींच्या मते भाजपा बचावात्मक पवित्र्यात गेल्याचेही चित्र आहे.