न्यायाधिश सवर्ण असल्याने लालूंना शिक्षा झाली, शिवानंद तिवारींचे वादग्रस्त वक्तव्य
आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पटना : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश सवर्ण समाजातील होते आणि यामुळेच हा निर्णय लालूंच्या विरोधात केल्याचे तिवारी म्हणाले. तिवारी एवढेच बोलून थांबले नाहीत. न्यायालयात जातींचा प्रभाव आहे. त्यामुळे लालूं सदर्भातील निर्णय देखील जातीच्या प्रभावाखाली येऊन दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
न्यायाधिशांना देखील जात असते. ते काय आकाशातून येत नाहीत. कशापद्धतीचा निकाल लागला आहे हे आम्ही सर्वांनी पाहील्याचे तिवारी म्हणाले. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांच्या विरुद्ध जे एफआयआर झाले त्यात षढयंत्र रचल्याचे म्हटले आहे. संविधानानुसार षढयंत्र रचल्याप्रकरणात ही शिक्षा मिळाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यानुसार ही शिक्षा देण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी होणार नाही. सर्व एकच मानले जाईल.
सर्वोच्च न्यायालयात अरुण मिश्रा न्यायाधिश होते आणि त्यांनी म्हटले सर्व प्रकरण वेगवेगळे होईल. हा न्यायालयाचा अवमान असून लालूंविरोधात अवमान याचिका दाखल व्हायला हवी असे भाजपा प्रवक्ता संजय टायगर म्हटले आहे. हे सर्व हताश आणि निराश लोक असल्याचे तिवारी म्हणाले.