बागपत (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या देशभक्ती आणि हनुमान प्रेमाचा दाखला पुन्हा एकदा दिला आहे. पाकिस्तानामध्ये जेव्हा दहशतवादी कॅम्प जळताना पाहतो तेव्हा मला हनुमानजींची आठवण येते. त्यांनी (हनुमान) लंकेत ज्याप्रमाणे आग लावली तसेच आमच्या जवानांनी दहशतवाद्यांचा सफाया केला असे योगी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज प्रत्येकाच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचे नाव आहे. तुम्ही एक एक खासदार निवडून जेव्हा पाठवाल तेव्हाच मोदी पंतप्रधान होतील. जेव्हा मोदी पंतप्रधान बनतील तेव्हा पुन्हा भारताला कोणी आव्हान देणार नाही असे योगी यांनी म्हटले. ही भूमि चरण सिंह यांची आहे. पण 30 वर्षांहून साखर कारखान्याची मागणी होत होती. जयंत सिंह निवडून आले पण त्यांनी काही केले नाही. पण जेव्हा सत्यपाल सिंह यांना जेव्हा निवडून देण्यात आले तेव्हा एका झटक्यात मागणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या शेतात जोपर्यंत उस आहे तोपर्यंत साखर कारखान्यातील धूर थांबणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला उसाचा मोबदला मिळेल असेही योगी यावेळी म्हणाले.


जाहीरनाम्यावर निशाणा 



योगी आदित्यनाथ यांनी यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला. शहरी नक्षल्यांनी काँग्रेसमध्ये घुसखोरी करुन काँग्रेस पार्टीला हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी लगावला.