नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत 59 जागांवर आज मतदान होत आहे. 8 राज्यातील साधारण 10.17 कोटी मतदार या टप्प्यातील 918 उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मतदान केले. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही आज सकाळी मतदान केले.  पाटणा साहिब मतदारसंघात या दोन्ही नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. इथे भाजपाचे रवीशंकर प्रसाद आणि काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी नितीश कुमार यांनी लांबलाचकतक मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानाचं कुठल्याही प्रकारे करता येणार नाही असंही त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


क्रिकेटपटू हरभजन सिंग याने पंजाबमध्ये जालंधर इथे मतदान केले. सकाळी हरभजन सिंग मतदान केंद्रावर आला आणि त्याने रांगेत उभं राहून मतदान केले.