पटना : भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांची समजूत काढण्यात भाजपाला यश आले आहे. ते आता बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहीती दिली. गिरिराज सिंह यांचे सर्व म्हणणे ऐकले आहे. पार्टी त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढेल. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 2014 ची लोकसभा निवडणूक गिरिराज सिंह नावादा मतदार संघातून लढले होते. त्यांना तिथे विजयही मिळाला होता. यावेली नवादा येथील जागा राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) च्या सहयोगी लोक जनशक्ती पार्टी( लोजपा) च्या खात्यात गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



नवादा सीट गेल्याने गिरिराज सिंह नाराज होते. त्यांनी अनेकदा प्रदेश नेतृत्वाच्या विरोधात नाराजी जाहीर केली. बेगूसराय ही माझी जन्मभूमी आहे. तिथून निवडणूक लढणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट असल्याचे गिरिराज म्हणाले होते. पण ज्या पद्धतीने मला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला त्यावर मला आक्षेप आहे. पण आता भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या ट्वीटने अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. गिरिराज सिंह आता बेगुसराय येथून निवडणूक लढण्यास तयार आहेत हे समोर येत आहे.