नवी दिल्ली : निवडणुकीच्या वर्षात सत्ता मिळवण्यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे पंतप्रधान मोदी पुन्हा सत्ता हातात घेण्याच्या तयारीत आहे तर विरोधक मोदी विरोधी पक्षांना एकत्र घेत भाजपला सत्तेतून खाली आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोणाची सत्ता येणार हे तर निवडणुकीनंतरच कळेल. नुकताच टाईम्स नाऊ आणि व्हीएमआर यांनी केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये राजस्थान, नार्थ ईस्ट, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्यप्रदेशमध्ये एनडीएला यश मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र भाजपचं अधिक नुकसान होऊ शकतं. दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील एनडीएला यश मिळताना दिसत नाही आहे.


उत्तर प्रदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश हे राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. कारण येथे अधिक जागा मिळवणारा पक्ष सहज सत्तेत येतो. मागच्या निवडणुकीत मोठं यश मिळालेल्या युपीत भाजपला सपा-बसपा युतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. यूपीमध्ये ८० पैकी ५१ जागा सपा-बसलाला मिळण्याची शक्यता आहे तर एनडीएला येथे २७ जागा मिळू शकतात. यूपीएला मात्र फक्त २ जागा येथे मिळतील.


मध्यप्रदेश


मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्य़ा २९ जागांपैकी, एनडीएला २३ जागा तर यूपीएला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेसला येथे त्याचा कोणताच फायदा झालेला दिसत नाही आहे.


राजस्थान


राजस्थानच्या एकूण २५ जागांपैकी NDA ला येथे १७ जागा तर UPA ला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. 


उत्तराखंड


उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या एकूण ५ जागांपैकी पाचही जागा एनडीला मिळताना दिसत आहे.


जम्मू-कश्मीर


जम्मू-कश्मीरमध्ये एकूण ६ पैकी नॅशनल कांफ्रेसला ४ जागा तर एनडीएला १ आणि यूपीएला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. 


हरियाणा 


हरियाणाच्या एकूण १० जागांवर यूपीएला २ तर एनडीएला ८ जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेमध्ये दिसत आहे. 


पंजाब


पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहे. यापैकी यूपीएला १२ तर आपला येथे १ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला येथे मोठा फटका बसताना दिसत आहे.


नवी दिल्ली


दिल्लीच्या एकूण ७ जागांपैकी एनडीएला ६ जागा तर आपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.


छत्तीसगड


छत्तीसगडमध्ये एकूण ११ जागांपैकी एनडीएला ५ तर यूपीएला ६ जागा मिळू शकतात. येथे दोन्ही पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते. 


गुजरात


गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण २६ जागा आहे. यापैकी एनडीएला येथे २४ जागा तर यूपीएला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र 


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहे. यापैकी एनडीला येथे मोठं यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात एनडीएला ४३ जागा तर यूपीएला फक्त ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.


नार्थ ईस्ट 


नॉर्थ ईस्टमध्ये NDA ला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. एकूण ११ जागांपैकी एनडीएला येथे ९ तर यूपीएला फक्त १ जागा मिळण्याची शक्यता आहे.


असाम


असामध्ये १४ जागांपैकी UPA ला ३ जागा तर एनडीएला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. AIDF ला येथे २ जागा मिळण्याची शक्यता आहे.


ओडिशा 


ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा आहे. यापैकी एनडीएला येथे १३ जागा तर बीजेडीला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.


झारखंड


झारखंडमध्ये यूपीएला ८ जागा तर एनडीएला ६ जागा मिळण्याती शक्यता आहे. 


बिहार


बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. येथे लालू यादव यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. यूपीएला येथे १५ जागा तर एनडीएला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.


पश्चिम बंगाल


पश्चिम बंगालबाबत अनेकांना उत्सूकता आहे. येथे ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. तृणमूल काँग्रेसला येथे ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला येथे ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीएला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.


पुडुचेरी


पुडुचेरीमध्ये लोकसभेची १ जागा आहे. येथे ही जागा यूपीएला मिळण्याची शक्यता आहे.


कर्नाटक


कर्नाटकमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. येथे यूपीए आणि एनडीए दोघांना १४-१४ जागा मिळण्याची शक्यता आहे. 


तेलंगणा


तेलंगणामध्ये यूपीएला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला येथे १ जागा मिळू शकते. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला येथे १० जागा मिळण्याची शक्यता आहे.


दक्षिण भारत


दक्षिण भारतातील तिन्ही राज्यांमध्ये एनडीएला फटका बसण्याची शक्यता आहे. तमिळनाडु, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये यूपीएला चांगलं यश मिळताना दिसणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये २५ पैकी YSRCP ला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे.


तमिलनाडू


तमिळनाडूमध्ये यूपीएला ३९ पैकी जवळपास सर्वच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीला येथे मोठा फटका बसणार आहे.


- ओपिनियन पोलमध्ये एनडीएला यूपीए पेक्षा अधिक जागा मिळत आहे. पण एनडीएला बहुमताचा आकडा गाठणं कठीण दिसत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेत येण्यासाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागू शकते.