Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्या क्षणापासून आता, अखेरच्या टप्प्यातील मतदानापर्यंत एकंदर राजकीय वातावरण पाहता निकालाचा कौल कोणाच्या खात्यात जाणार आहे याचा पहिलावहिला अंदाज समोर आला आहे. इथं नेतेमंडळी 'विजय आमच्याच पक्षाचा' असा दावा करत असताना तिथं अमेरिकेतील राजकीय जाणकार आणि अभ्यासक इयान ब्रेमर यांनी एक मोठा दावा केला आहे. भाजपच्या वाट्याला नेमक्या किती जागा मिळणार याचा आकडाच ब्रेमर यांनी जाहीर केला आहे.
'अब की बार 400 पार' असं आत्मिविश्वासानं सांगणाऱ्या आणि सुरुवातीपासूनच विजयाची ग्वाही देणाऱ्या सत्ताधारी पर्षाच्या वाट्याला 305 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळणार असल्याचा अंदाज आपल्या निरीक्षणांच्या बळावर ब्रेमर यांनी वर्तवला. यामध्ये 10 जागा कमीजास्त होऊ शकतात पण, भाजपच्या विजयी उमेदवारांचा आकडा याच घरात राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
अमेरिकेतील अग्रगण्य राजकीय तज्ज्ञ आणि रिस्क अँड रिसर्च कन्सल्टिंग फर्म यूरेशिया ग्रुपचे संस्थापक इयान ब्रेमर यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करत हा दावा केला. (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होऊ पाहताना, भाजपला या निवडणुकीत 295 ते 315 दरम्यान जागा मिळवण्यात यश मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा : Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन
इथं आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मंडळींपासून खुद्द मोदी आणि शाहसुद्धा भाजपच्या विजयाची हमी देत असतानाच तिथं विरोधी गटाकडून मात्र सत्ताधाऱ्यांना तगडं आव्हान दिलं जात आहे. इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेते, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर काही नेतेमंडळींनी देशात भाजपला जनतेनं नाकारलं आहे, असाही सूर आळवला आहे. त्यामुळं आता खरंच निकालात कोणतं वेगळं वळण येतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचीच सरशी... पंतप्रधानांचा विश्वास
बुधवारी दिल्लीतील द्वारका येथे प्रचारसभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील पाचही टप्प्यांमधील मतदानात भाजप - एनडीएचीच सरशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेतेमंडळीचे दावे, पक्ष आणि मतदारांवर त्यांचा असणारा विश्वास आणि देशातील सद्यस्थिती पाहता आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम आकडेवारीचीच सर्वांना प्रतीक्षा आहे, हे नाकारता येत नाही.