Sharad Pawar Nitish Kumar Meeting: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर कोणता चेहरा द्यायचा (Opposition Candidate) असा प्रश्न विरोधकांसमोर आहे. यावर निर्णय घेण्यासाठी विरोधकांच्या बैठका सुरु झाल्यात. दिल्लीत 8 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याबरोबरच काही महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून विरोधकांची बैठक बोलण्याचा सल्ला दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर एकमत होण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्याचे जास्त खासदार असतील तो त्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा, असा फॉर्म्युला बनवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर कोणाचा प्रबळ दावा?
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. बिहारमधील जेडीयूचा (JDU) मित्रपक्ष असलेल्या आरजेडीनेही (RJD) उघडपणे पाठिंबा दिला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनीही नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, विरोधी पक्षात ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, केसीआर, स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल असे अनेक नेते आहेत जे पंतप्रधानपदावर दावा करू शकतात.


कोणत्या पक्षाचा नेता बनणार विरोधी पक्षाचा प्रमुख?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विरोधी पक्षाचे सर्वाधिक खासदार असतील, त्या पक्षाचा पंतप्रधान करण्यावर सहमती होऊ शकते. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत,  महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत.


विरोधकांकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न
याशिवाय काँग्रेसकडून (Congress) राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करू शकते. कोणत्या विरोधी पक्षाला जास्त जागा मिळतील आणि कोणत्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदाचा उमेदवार होईल हे सांगणे सध्या कठीण आहे, पण पंतप्रधान मोदींना तोडीसतोड आव्हान देण्यासाठी विरोधक 2024 पूर्वी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.