Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर टीका केलीय. हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय. एका परिवाराच्या मोहात फसलेल्या कॉंग्रेसची हरियाणामध्येदेखील तिच परिस्थिती आहे. कॉंग्रेस इतिहासात सर्वात दयनीय अवस्थेतून जातेय. त्यांचे नेता स्वत:चे एक स्टार्टअप संभाळू शकत नाहीत. हे लोक देश संभाळण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉंग्रेसचे जुने नेते एक एक करुन पक्ष सोडून चालले आहेत. यांच्यासोबत शपथ घेतली होती, तेच पळून गेले आहेत. कॉंग्रेसकडे स्वत:चे कार्यकर्तेदेखील शिल्लक नाहीयत.  जिथे कॉंग्केसचे सरकार आहे तिथे ते आपले सरकार संभाळू शकत नाहीएत. सत्तेत राहणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा विचार कॉंग्रेस करत राहिली. पण जेव्हापासून गरिबाचा मुलगा पंतप्रधान झालाय, तेव्हापासून माझ्याविरुद्ध कटकारस्थान सुरु आहे. पण तुमच्या आशीर्वादामुळे मी सुरक्षित असल्याचे पंतप्रधान जनतेला संबोधून म्हणाले. 


पंतप्रधानांच्या निशाण्यावर कॉंग्रेस 


कॉंग्रेस जितके कटकारस्थान करते, जनता तितकीच मला मजबूत करतेय. त्यांचा आशीर्वाद देते. यावेळी देखील कॉंग्रेसने माझ्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. पण आया बहिणी माझ्यासाठी ढाल बनून उभ्या आहेत. या मला संकटातून बाहेर काढत आहेत. जनतेचे कवच माझ्यासोबत आहे. तुमचा आशीर्वाद मी अनुभवतोय, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 


इटलीत वडिलोपार्जित संपत्ती पण स्वत:ची गाडी नाही! किती आहे सोनिया गांधींचे नेटवर्थ?


हरियाणाच्या जनतेचे आभार 


10 वर्षांमध्ये भारत 11 व्या नंबरवरुन पाचव्या नंबरची आर्थिक महाशक्ती बनण्यास यशस्वी झालाय. हे सर्व तुमच्या आशीर्वादाने शक्य झालंय. आता मला माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये, येणाऱ्या वर्षात भारताला तिसरी मोठी आर्थिक ताकद बनवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 


हरियाणातील भाऊ आणि बहिणींनो भारत विकसित होण्यासाठी हरियाणा विकसित होणे गरजेचे आहे. हरियाणामध्ये तेव्हाच विकास होईल जेव्हा येथे आधुनिक रस्ते बनतील.  हरियाणामध्ये तेव्हाच विकास होईल जेव्हा येथे मोठी रुग्णालये बनतील. आधुनिक रेल्वेचे नेटवर्क असेल तेव्हा हरियाणा विकसित होईल. काही वेळांपुर्वीच अशा अनेक कामांशी संबंधित 10 हजार कोटींच्या योजना हरियाणाला सोपावण्याची संधी मला मिळाली. यामध्ये रेवाडी एम्सचा देखील समावेश आहे.