LokSabha Election: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची युती उत्तर प्रदेशात तृष्टीकरणाचं राजकारण असत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केला आहे. आग्रा येथे प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने ओबीसी कोटा चोरला असून, धर्माच्या आधारे आरक्षण देत आहे असा आरोपही नरेंद्र मोदीनी केला आहे. "उत्तर प्रदेशात दोन मुलांमधील मैत्री ही तृष्टीकरण राजकारणाच्या आधारावर आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृष्टीकरणाच्या राजकारणाने देशाची विभागणी केली आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. "आम्ही तृष्टीकरण संपवत असून, लोकांच्या समाधानासाठी काम करत आहोत," असं नरेंद्र मोदी म्हणाले.


"आपल्या देशाने तुष्टीकरणाचं बरंच राजकारण पाहिलं असून त्यामुळे देशाचे तुकडे झाले आहेत. तुष्टीकरणाच्या राजकारणाने सत्य आणि प्रामाणिक लोकांचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी तुष्टीकरण संपवत आहेत आणि समाधानाकडे वाटचाल करत आहेत," असं त्यांनी सांगितलं. 


आपलं सरकारने सर्वाच्या विकासाचं आश्वासन दिलं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. "समाजवादी पार्टी-काँग्रेस इंडिया आघाडी युतीसाठी फक्त आपली व्होट बँक महत्वाची आहे. आमचा 10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असो किंवा भाजपचा जाहीरनामा, आमचा भर समाधानावर आहे. प्रत्येकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, प्रत्येकाला मध्यस्थांशिवाय पूर्ण लाभ मिळावा, लाच न देत पात्र असणाऱ्यांना तो नक्कीच मिळावा, हे भाजपाचे मॉडेल आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 


याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने कष्टाने कमावलेला पैसा हिसकावून घेत, अनेक मुलं असणाऱ्यांना तो वाटण्याचं ठरवलं आहे असा आरोप त्यांनी केला होता. 


निवडणूक आयोगाने घेतली दखल


केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद मोदींनी आचारसंहिता उल्लंघन केल्याची दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी बंसवारा येथे केलेल्या विधानाप्रकरणी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना उत्तर देण्यास सांगण्यात आलं असून 29 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसंच सर्व स्टार प्रचारकांना उच्च मापदंड ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गे यांनाही नोटीस बजावली आहे.