Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपांचा तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाहीय. दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरु आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मविआला टोला लगावला आहे. मविआने दिलेल्या जागा आम्ही परत करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कुठे ना कुठे समाविष्ट करुन घ्याव असा त्यांचा विचार चाललाय. काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. कॉंग्रेसने यादी जाहीर केली आहे. पण मतभेद असलेल्या मतदार संघाबद्दल काही झालं नाही. शिवसेनेही यादी जाहीर केली नाही. आम्ही बसायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना 4 जागा परत देतोय. पण अधिकृतपणे प्रत्यक्षात ते 3 जागा देत आहेत. 26 तारखेला आमची भूमिका आम्ही जाहीर करु.


लहान पक्षांचा समावेश करून घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली होती. त्यांनी ती पूर्ण केली नाही. मतभेद असलेले मतदार संघ काँग्रेसने जाहीर केले नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला नाही, असेही ते म्हणाले. ज्यापद्धतीने उमेदवार पळवापळी चालली आहे. त्यावरुन यांची ताकद काय ते कळाले. इतर पक्षात खिळखिळे करा. त्यांची ताकद ठेवू नका. मग आपल्याला जिंकता येईल, अशी भाजपची स्टॅटर्जी असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, त्याला वेळ लागतो. अन्यता आम्हाला अर्धा तासात फॉर्म भरता येईल.


मतभेदाच्या जागांचा प्रश्न आधी सोडवा


कॉंग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालतेय, असे आम्ही करत नाही. मतभेदाच्या जागांचा प्रश्न आधी सोडवा असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलोय.  वंचित आम्हाला प्रतिसाद देत नाही, असं काहीही म्हणताता. आमच्या 15 जागांचा प्रश्न सुटलाय हे त्यांनी सांगाव, असे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडील उद्देशून म्हटले. तसेच 400 पार अशी घोषणा देतात म्हणजे संविधान बदलण्याच्या दृष्टीने पाऊल असल्याचा आरोप त्यांनी केला.


26 तारखेपर्यंत वाट पाहू


येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. तोपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर त्यानंतर पुढील दिशा ठरवू. आमची जी काही भूमिका असेल ती सर्वांसमोर जाहीर करु", असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. "महाविकासआघाडीच्या तिढ्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही त्याबद्दल त्यांनाच विचारा. प्रकाश शेंडगे यांनी एक नवीन पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक यादी आमच्याकडे दिली आणि त्यावेळी युतीबद्दल चर्चा केली. यावेळी मी त्यांना आमचंच घोंगड महाविकासआघाडी सोबत भिजत पडलेला आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही काहीही बोलू शकत नाही किंवा यावर अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. आमची दीड तास चर्चा झाली. त्यात कोणकोणते मतदारसंघ मागत आहे, का मागतात याची माहिती घेतली", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.