लखनऊ : काँग्रेस महासचिव तसंच पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक प्रचाराला प्रारंभ केलाय. बुधवारी २० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीत प्रियांका गांधी दाखल होणार आहेत. प्रियांकांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी सकाळी ९.०० वाजता चुनारपासून रस्ते मार्गानं वाराणसीला पोहचतील.


असा असेल प्रियांकांचा दौरा


- सकाळी ११.०० वाजता प्रियांका गांधी वाराणसीच्या शितला मंदिरात महिला समुहांची भेट घेणार आहेत


- सकाळी ११.३० वाजता प्रियांका सुल्ताशकेश्वर मंदिरात दर्शन आणि पूजा करतील


- दुपारी २.०० वाजता प्रियांका गांधी वाराणसीच्या रामनगर स्थित माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानाला भेट देतील


- जवळपास दुपारी ३.०० वाजता प्रियांका गांधी अस्सी घाटावर स्थानिक आणि जनप्रतिनिधींची भेट घेतील. 


यानंतर त्या अस्सी घाटाजवळून होडीतून शाश्वमेघ घाटावर पोहचतील. तिथून त्या काशी विश्वनाथ मंदिरात त्या दर्शन-पूजन करतील. दुपारी ४.०० वाजल्याच्या सुमारास प्रियांका गांधी वाराणसी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल होतील. सायंकाळी जवळपास ६.३० वाजता पक्ष कार्यालयातून प्रियांका गांधी बाबतपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून रवाना होतील.