मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात  व्यक्त केले आहे.


राज्यानिहाय कौल पाहा कोणाला?


उत्तर प्रदेश एकूण ८० जागा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा- ५०
काँग्रेस - ५
सपा-बसपा- २५



बिहार - एकूण ४० जागा 


भाजपा - २८
काँग्रेस - १०
इतर - २


झारखंड एकूण १४ जागा


भाजपा - ७
काँग्रेस - ७


छत्तीसगड एकूण ११ जागा


भाजपा - ४
काँग्रेस - ७ 



पंजाब एकूण १३ जागा


भाजपा - १
काँग्रेस - १०
इतर - २


हरियाणा एकूण १० जागा


भाजपा - ६
काँग्रेस - ३
इतर - १



गुजरात एकूण २६ जागा


भाजपा - २४
काँग्रेस - २


महाराष्ट्र एकूण ४८ जागा


युती - ३०
काँग्रेस आघाडी - १७


भाजप - १६
शिवसेना - १४
राष्ट्रवादी - १०
काँग्रेस - ७
इतर - १



कर्नाटक एकूण २८ जागा


भाजपा - ८
काँग्रेस - २०


काश्मीर एकूण ६ जागा


भाजपा - ३
काँग्रेस - ०
नॅशनल कॉन्फरन्स - २
पीडीपी - १