सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आणि INDIA आघाडीत जबरदस्त चुरस, अमेठी, अयोध्येत भाजप पिछाडीवर
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात.
Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत आपल्यासमोर असतील. मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजण्यात आल्या. आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची (ईव्हीएम) मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीत जोरदार चुरस आहे. सुरुवातीला 300 जागांचा आकडा पार करणारी एनडीए 273 जागांपर्यंत मागे आली आहे. तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.
सत्ताधारी एनडीएची पिछेहाट होताना दिसतेय तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रात एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरस वाढली आहे. जाबमध्ये भाजप दोन जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस तीन जागांवर पुढे आहे. काँग्रेस नेते राहुले गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर पुढे आहेत. अयोध्या आणि अमेठीत भाजप पिछाडीवर आहे.
ताज्या निकालात कोण पुढे कोण मागे?
वायनाडमधून राहुल गांधी पुढे
अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी मागे
मनोहर लाल कर्नालमधून मागे
सुलतानपूरमधून भाजपच्या मनेका गांधी मागे
मथुरेतून भाजपच्या हेमा मालिनी पुढे
मेरठमध्ये भाजपचे अरुण गोविल मागे