Online Game : प्रेम आंधळं असतं हे वाक्य कधी कधी काही प्रेमी युगुलांसाठी अगदी तंतोतंत लागू होतं. प्रेमात पडलेली व्यक्ती ही आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असते. प्रेमासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी प्रियकर किंवा प्रेयसी कोणत्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्याही तुम्ही वाचल्या सुद्धा असतील. पण ऑनलाईन (Online Gaming) ओळख झाल्यानंतर प्रेमात पडलेल्या एका जोडप्याने सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 वर्षाच्या मुलीचा तब्बल 2400 किलोमीटरचा प्रवास


सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, ऑनलाईन गेमिंग याच्यामागे अक्षरक्षः वेडी झाली आहे. हे ऑनलाईन गेम खेळण्यासाठी लहानग्यांपासून तरुणांपर्यंत कोणतेही पाऊल तयारी यांची असते. अशाच एका गेममुळे दोघे जण जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ऑनलाईन पब्जी गेम (PUBG Game) खेळताना दहावीची विद्यार्थिनी एका तरुणाच्या प्रेमात पडली. ही विद्यार्थिनी या तरुणाच्या प्रेमात इतकी गुंग झाली की तिने तिचे राहत घर सोडलं आणि प्रियकराला भेटण्यासाठी तब्बल 2400 किलोमीटरचा प्रवास केला.


अंदमानला निकोबारला  (Andaman and Nicobar Islands) राहणारी विद्यार्थिनी आपलं प्रेम मिळवण्यासाठी थेट उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये पोहोचली होती. ही मुलगी PUBG गेम खेळताना बरेलीच्या फरीदपूर भागातील एका 21 वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी अंदमान-निकोबारपासून हजारो किलोमीटरचा प्रवास करून बरेलीला पोहोचली. विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. यानंतर अंदमान पोलिसांनी दोघांच्या शोधात अंदमान-निकोबारहून उत्तर प्रदेशातील बरेली गाठले. या प्रकरणाची माहिती बरेली पोलीस अधिकार्‍यांना मिळताच एकच खळबळ उडाली.


अंदमान पोलिसांनी उत्तर प्रदेशात ठोकला तळ


मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत असताना, बरेलीच्या फरीदपूर भागात राहणारा एक मुलगा आणि देशाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या अंदमान-निकोबारमध्ये राहणारी दहावीत शिकणारी मुलगी प्रेमात पडली होती. यानंतर विद्यार्थिनी अंदमान-निकोबारहून बरेलीला पोहोचली. विद्यार्थ्याचा शोध घेत अंदमान निकोबार पोलीसही बरेलीला पोहोचले. अंदमान निकोबार पोलीस अनेक दिवसांपासून बरेली येथे तळ ठोकून मुलीचा शोध घेत होते. शेवटी फोन ट्रेसिंगच्या आधारे पोलिसांनी तरुण आणि तरुणीला शोधून काढले. त्यानंतर पोलिसांना मुलीला घेऊन अंदमान निकोबारला जाण्याचा प्रवास सुरु केला.