कानपूर : कानपूर येथून निघालेली कालिंदी एक्सप्रेस बर्राजपूर स्थानकावर थांबली असताना एक्सप्रेसच्या शौचालयात हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच रेल्वेत एकच खळबळ उडाली. घटनेनंतर एसएसपी घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही. पण यानंतर संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. हा स्फोट कशामुळे झाले याबाबत अजून कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरचे पोलीस अधिकारी अविनाश चंद्रा यांनी म्हटलं की, 'रेल्वेच्या जनरल कोचमधील शौचालयात हा स्फोट झाला. घटनास्थळी पोलिसांना एक कागद मिळाला आहे पण त्यावर काय लिहिलं आहे हे कळू शकलेलं नाही. पण हे धमकी देणारं पत्र आहे.'


बुधवारी मुंबईत देखील एका कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच रेल्वेत स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत. यामागे दहशतवादी संघटनांचा हात असू शकतो.