घरगुती गॅस सिलिंडर महागला
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढ केल्याने दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम अनुदानित गॅस सिलिंडरचा दर आता ४८८.६८ रुपये झाला आहे. आतापर्यंत अनुदानित गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना ४८७.१८ रुपये मोजावे लागत होते. यापूर्वी एक सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
विमान इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युअल (एटीएफ) च्या दरात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ऑगस्टपासून ही तिसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे एटीएफच्या दरात वाढ झाली आहे.
एटीएफच्या दरात वाढ झाल्यामुळे दिल्लीत आता एटीएफचा भाव प्रति किलोलिटर ३,०२५ रुपयांवरुन ५३,०४५ रुपये प्रति किलोमीटर झाला आहे.