LPG Cylinders News : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे गृहिणींना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (LPG Cylinder Price )


या पेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या नियमानुसार आता घरगुती स्वयंपाक सिलिंडर ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करताना आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलिंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार याला आता बंधन आले आहे. त्यामुळे वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. 


एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ही मर्यादा आली आहे. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या रिफिलहून महाग असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो, अशा काही तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 


इतकेच मिळणार अनुदानित सिलिंडर 


अनुदानित सिलिंडरही ठराविक मिळणार आहे.  तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज लागल्यास विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.