मुंबई : LPG Cylinder Booking : कोरोना महामारीच्या काळात महागाईने कंबरडे मोडले आहे. दरम्यान, LPG सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. (LPG Cylinder Price) मात्र, तुम्हाला स्वस्तात गॅस सिलिंडर मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी एक ऑफर आली आहे. ही ऑफर पॉकेट्स अ‍ॅपद्वारे दिली जात आहे. या अ‍ॅपच्या मदतीने डिजिटल पेमेंटची सुविधा मिळत आहे. या अ‍ॅपवरुन गॅस सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला कॅशबॅक ऑफर (Cashback offer) मिळेल.


तुम्हाला किती कॅशबॅक मिळतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पॉकेट्स अ‍ॅपद्वारेही गॅस बुक केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक (जास्तीत जास्त 50 रुपये) मिळेल. हे अॅप आयसीआयसीआय बँकेद्वारे चालवले जाते.


येथे देखील फायदा होईल


तुम्ही पॉकेट्स अ‍ॅपद्वारे गॅस बुकिंग व्यतिरिक्त 200 रुपये किंवा त्याहून अधिक बिल भरले तरीही कॅशबॅक (Cashback offer) दिला जाईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कोणताही प्रोमोकोड वापरावा लागणार नाही.


तुम्हाला असा कॅशबॅक मिळेल ?


सर्व प्रथम, मोबाइलवर पॉकेट्स वॉलेट अ‍ॅप डाऊनलोड करा आणि उघडा.
येथे रिचार्ज आणि पे बिले विभागात, पे बिल्सवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला Choose Billers मध्ये More चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला LPG चा पर्याय दिसेल. येथे सेवा प्राधान्य निवडा.
येथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि बुकिंगची रक्कम भरा.
व्यवहारानंतर, तुम्हाला 10 टक्के (जास्तीत जास्त 50 रुपये) कॅशबॅक रिवॉर्ड्स मिळतील.
तुम्ही रिवॉर्ड्स उघडताच तुमच्या पॉकेट्स वॉलेटमध्ये कॅशबॅक जमा केला जाईल.