मुंबई : LPG Cylinder price : आपल्याला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची सबसिडी (Rasoi gas Ki Subsidy) येत आहे की नाही, हे पाहायचे असेल तर आपल्याला एक काम करावे लागेल. LPG सिलिंडरवर सबसिडी मिळत नसेल तर आपले आधार लिंक (LPG Aadhaar Linking) नसण्याचे कारण असू शकते. राज्यांत एलपीजीची सबसिडी वेगवेगळी ठरवली गेली आहे. ज्या लोकांना वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न आहे. यात पती आणि पत्नी या दोघांच्या उत्पन्नाचा समावेश गेला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडस्ट्रीट्रीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सरकारने घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी सबसिडी 153.86 रुपयांवरुन 291.48 रुपये केली गेली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनामध्ये  Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) अनुदान 174.86 वरून 312.48 रुपये करण्यात आले आहे. तुम्हाला जर सबसिडी मिळत असेल तर एलपीजी सिलिंडर ग्राहक एका सिलिंडरसाठी 300 रुपये कमी द्यावे लागतील. 


आधार कार्डच्या माध्यमातून एलपीजी सबसिडी मिळण्यासाठी आधार कार्ड्सला बँक अकाऊंटला लिंक करावे लागेल. त्यानंतर ग्राहकांना आपले एलपीजी कनेक्शन आधार (Aadhaar) कार्डद्वारे लिंक करणे गरजेचे आहे.


प्रथम पाहा की, आपला मोबाइल नंबर इंडेन गॅस ( Indane) एजन्सीसह रजिस्टर आहे का?. यासाठी आपण आपल्या मोबाइलच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन टाइप करा IOC <गॅस एजन्सीचा टेलिफोन नंबरचा STD कोड> आणि त्यानंतर कस्टमर केअर नंबर वर पाठवून द्या. आपल्याला गॅस एजन्सीचा नंबर माहित नाही नसेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. https://cx.indianoil.in. तुम्ही मोबाईल नंबर आधी रजिस्टर केला असेल तर तुम्हाला थेट गॅस एजन्सीचा मॅसेज पाठवून आधार लिंक करावा.


1- मोबाइल क्रमांकवरुन लिंक करणे


एकदा आपला मोबाइल नंबर रजिस्टर करा, तेव्हा आपण टाइप करा यूआयडी <Aadhaar number> आणि गॅस एजन्सीचा नंबर पुन्हा पाठवा. असे केल्यानंतर आपले गॅस कनेक्शन आपल्या आधारावर लिंक होईल. याची माहिती आपल्या मोबाइल नंबरवर येईल.


2- SMS च्या माध्यमातून


SMS करण्याशिवाय दुसरा मार्ग आहे की, तुम्ही Indane गॅस एजन्सीचा नंबर 1800 2333 5555 वर आपल्या रजिस्टरड मोबाईल नंबरवरुन कॉल करा. आपला आधारनंबर कस्टमर केअर कर्मचारी सांगेल, जो आपला आधार नंबर गॅस कनेक्शनला लिंक करेल.


3-  UIDAIच्या वेबसाइटवरुन लिंक करा


UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर जा. आपला पत्ता आणि अन्य दुसरी जरुरीची माहिती भरा. स्कीम टाइप, डिस्ट्रिबटरचे नाव, इंडेन गॅस आयडी वगैरे. कॉन्टॅक्ट डिटेक्ट भरल्यानंतर आपण सबमिट बटणावर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो भरून आणि अॅप्लिकेशन पूर्ण करा. आपला आधार आणि गॅस कनेक्शन लिंक होईल.


4- IVRSच्या माध्यमातून


प्रथम Indaneच्या अधिकृत वेबसाइट https://cx.indianoil.in/webcenter/portal/LPG/pages_bookyourcylinder वर जा, येथे IVRS (परस्पर व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम) चा पर्याय निवडा. क्लिक करा. कॉन्टॅक्ट डिटेल मिळेल. आपण येथे 7718955555 कॉमन नंबर दिसेल. IVRS नंबरवर कॉल केल्यानंतर आपल्याला आपला आधार भरावा लागेल आणि प्रक्रियेचे पालन करावे लागेल. आपले आधार गॅस कनेक्शनचे लिंक होईल.