मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडालाय. रेल्वे तिकीट दरापाठोपाठ विना-अनुदानित सिलिंडरचीही दरवाढ करण्यात आलीय. आजपासून विना-अनुदानित सिलिंडरसाठी १९ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वाढलेले भाव १ जानेवारी २०२० अर्थात आज सकाळपासून लागू झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस कंपन्यांनी विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या भावात वाढ केल्यानं मुंबईत एलपीजी सिलिंडर ६८४ रुपयांवर गेलाय तर दिल्लीत एलपीजी सिलिंडर ७१४ रुपयांवर गेलाय. डिसेंबरमध्ये याच गॅसची किंमत ६९६ रुपये (१४.२ किलो) होती. उल्लेखनीय म्हणजे, सलग पाच महिने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होताना दिसतेय.


पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याला दरांची तपासणी करतात. जानेवारीच्या रिविजननंतर सिलिंडर दरात १९ रुपयांची वाढ करण्यात आली.



कमर्शिअल सिलिंडरच्या किंमती मुंबईत ११९० रुपये, दिल्लीत १२४१ रुपये, कोलकातामध्ये १३०८ रुपये तर चेन्नईमध्ये १३६३ रुपयांवर गेलीय. 
 
दुसरीकडे, केंद्र सरकारनं कालच रेल्वेच्या भाडेवाढीची घोषणा केली. आजपासून रेल्वे प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर १ पैसा जादा मोजावा लागणार आहे. रेल्वे भाडेवाढीपाठोपाठ एलपीजी गॅसचेही दर वाढल्यामुळे ग्राहकांना डबल झटकाल बसलाय.