कामाची बातमी! आता Address Proof शिवाय मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ते
LPG Latest News : एलपीजी कनेक्शन (एलपीजी गॅस सिलिंडर) घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
मुंबई : LPG Latest News : एलपीजी कनेक्शन (एलपीजी गॅस सिलिंडर) घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता आपल्याकडे अॅड्रेस प्रूफ नसला (without address proof) तरी आपण सिलिंडर खरेदी करू शकता. सामान्य लोकांना दिलासा देणण्यासाठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (IOCL) एलपीजीवरील पत्त्याचे बंधन रद्द केले आहे. म्हणजेच, तुम्ही अॅड्रेस प्रूफशिवायही गॅस घेऊ शकता. जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ती.
आता अॅड्रेस प्रूफशिवाय सिलिंडर मिळणार
याआधी अॅड्रेस प्रूफशिवाय एलपीजी सिलिंडर घेता येत नव्हते. पण आता हा नियम बदलण्यात आला आहे. आता ग्राहक त्यांच्या शहराजवळ किंवा त्यांच्या शेजारी असलेल्या इंडेन गॅस वितरक किंवा पॉईंट ऑफ सेलला भेट देऊन 5 किलो एलपीजी सिलिंडर सहज खरेदी करू शकतात. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. तिथे फक्त सिलिंडरची किंमत देऊन तुम्हाला सिलिंडर मिळेल. इंडेनच्या विक्रीच्या ठिकाणाहून 5 किलो सिलिंडर भरला जाऊ शकतो. हे सिलिंडर बीआयएस प्रमाणित आहेत.
सिलिंडर देखील परत देऊ शकता
जर आपण गॅसऐवजी इतर कोणत्याही पर्यायांचा पर्याय निवडला असेल किंवा आपण शहर सोडत असाल तर आपण हे गॅस सिलिंडर इंडेनच्या विक्रीच्या ठिकाणी परत करू शकता. 5 वर्षात परत केल्यास, सिलिंडर किंमतीच्या 50 टक्के रुपये परत देण्यात येईल. आणि 5 वर्षानंतर सिलिंडर परत देताना 100 रुपये मिळतील.
घरातून सहज बुक करा
याशिवाय आपण रिफिलसाठी गॅसही बुक करू शकता. यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. यासाठी इंडेनकडून 8454955555 हा विशेष क्रमांक जारी केला आहे. देशाच्या काना कोपऱ्यातून या क्रमांकावर मिस कॉल करून आपण एक लहान सिलिंडर बुक करू शकता. व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही सिलिंडरही बुक करू शकता. रिफिल टाइप करून, आपण 7588888824 नंबरवर संदेश पाठवू शकता, आपले सिलिंडर बुक केले जाईल. आपण 7718955555 वर कॉल करून सिलिंडर देखील बुक करू शकता.