मुंबई : पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सरकारी कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार (१ ऑक्टोबर)पासून घरगुती गॅस सिलेंडरचे भाव १५ रुपयांनी वाढले आहेत. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलेंडरचे भाव वाढले आहेत. १ सप्टेंबरला विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे भाव १५.५० रुपयांनी वाढले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईमध्ये १४.२ किलोचा घरगुती वापराचा विनाअनुदानित गॅस सिलेंडर ५७४ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत ६०५ रुपये, कोलकात्यामध्ये ६३० रुपये आणि चेन्नईमध्ये ६२० रुपये एवढी झाले आहे.



सरकारकडून वर्षाला १२ सिलेंडरसाठी अनुदान मिळतं यानंतरचे पुढचे सगळे सिलेंडर ग्राहकाला पूर्ण पैसे द्यावे लागतात. अनुदानित सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर घेताना बाजार मूल्य द्यावं लागतं. यानंतर अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होतं.