महागाईचा आणखी एक झटका, घरगुती LPG सिलिंडर महाग
LPG Price : महागाईचा भडका उडाला आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबई : LPG Price in Mumbai : सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसला आहे. Liquefied petroleum gas (LPG) सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे आता मुंबईत 14.2 किलोंचा सिलिंडर 1000 रुपयांना मिळणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं अक्षरशः मोडले आहे.
आधीच पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण झालेत. याआधी घरगुती सिलिंडरसाठी 949 रुपये 50 पैसे मोजावे लागत होते. आता त्यात पुन्हा दरवाढ झाल्यामुळे सिलिंडर 1000 रुपयांना विकत घेण्याची वेळ सामान्यांवर आली आहे गेल्या 10 महिन्यात एलपीजी सिलेंडर 165 रुपये 50 पैसे महागला आहे. जुलै 2021 पासून तब्बल 5 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. आता मुंबईत सिलिंडर 999.50 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही 999.50 रुपयांना गॅस मिळणार आहे.
भारत सरकार सिलिंडरचे दर महिन्याला बदल असते. गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक कारणांसाठी या गॅसच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर किंमतीतही वाढ झाली आहे. एलपीजीची किंमत, मुख्यत्वे क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असते. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने आता गॅसही महागला आहे. मुंबईतील एलपीजी सिलिंडरचे दरही वाढले आहेत. गरीब घटकांसाठी सरकारने या किमतींवर अनुदान दिले आहे. मुंबईत आज विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 होती. आता हा एलपीजी 999.50 रुपयांना मिळणार आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढून 2355.50 रुपयांवर पोहोचली, जी पूर्वी 2253 रुपये होती. तसेच, 5 किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी, 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजीचा दर 1 एप्रिलला 250 रुपये प्रति सिलिंडरने वाढवून 2,253 रुपये झाला होता. शिवाय, 1 मार्च 2022 रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.