LPG Subsidy | तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी नक्की मिळतेय ना? लगेचच चेक करा
तुम्हाला LPG सबसिडी मिळतेय की, नाही, याबाबत एका मिनिटात माहिती मिळवता येऊ शकते
नवी मुंबई : घरघुती गॅस सिलेंडरवर सबसिडी (LPG subsidy) मिळतेय की नाही. याबाबत तुमचा गोंधळ होत असेल तर, तुमचा गोंधळ एका मिनिटात दूर होऊ शकतो. तुम्हाला सबसिडी मिळतेय की, नाही, याबाबत एका मिनिटात माहिती मिळवता येऊ शकते
Check through LPG ID च्या माध्यमातून तपासा
पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPGच्या दरांमध्ये वाढ करीत आहेत. यामुळे असंख्य ग्राहक याबाबतीत विचार करीत आहेत की, त्यांना सबसिडी मिळेल की नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, सबसिडी तपासण्याची पद्धत माहित करून घ्या. दोन पद्धतीने तुम्हाला सबसिडी तपासता येईल.
- इंडेन, भारत किंवा एचपी या कंपन्यांकडे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या आधारे
- गॅसपासबुक वरील LPG ID चा वापर करून
यामुळे तुमची सबसिडी थांबू शकते (Due to this, subsidy can be stopped)
LPG Cylinder price : जर तुम्हाला LPG ची सबसिडी मिळत नसेल, तर तुमचे LPG आधार क्रमांकाशी जोडला (LPG Aadhaar Linking) आहे का हे तपासून बघा
वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या लोकांचे उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांना LPG सबसिडी मिळत नाही.
अशी तपासा सबसिडीची रक्कम
- 'माय एलपीजी'च्या संकेत स्थळाला भेट द्या - क्लिक करा
- या ठिकाणी 17 अंकी LPG ID नमूद करा
- नोंदणीकृत संपर्क क्रमांक नमूद करा registered mobile number
- कॅप्चा कोड भरा (captcha code)
- तुमच्या क्रमांकावर OTP येईल
- पुढील पानावर जाऊन आपला ईमेल आयडी नमूद करा
- ईमेल आयडीवर आलेली एक्टिवेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे अकाऊंट एक्टिवेट होईल.
- यानंतर mylpg.in वर जाऊन लॉगइन करा
- आधार क्रमांक एलपीजीला लिंक असेल याची खात्री करा
- त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा
याठिकाणी आपल्याला आपल्या खात्यावर सबसिडी ट्रान्सफर झाली आहे की नाही. हे तपासता येईल