जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...
करुणानिधी यांच्या नावावर ना घर, ना गाडी... किंवा त्यांच्या नावावर एखादी जमीनही नाही...
मुंबई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले.... तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही... अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे.
अधिक वाचा : ...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार!
निवडणुकीचा अवाढव्य खर्च
एम करुणानिधी यांनी २०१६ साली शेवटची निवडणूक थिरुवरूर विधानसभा मतदारसंघातून लढली होती. सलग दुसऱ्यांदा ते या जागेवरून निवडून आलेत. त्यांनी या निवडणुकीत आर पन्नीरसेल्वम यांना पछाडलं होतं. 'एडीआर'च्या अहवालानुसार या निवडणुकीत त्यांनी तब्बल १५ लाख ५७ हजार ६८० रुपयांचा खर्च केला होता. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी त्यांना निवडणुकीच्या खर्चासाठी केवळ १९,१२,८८० रुपये देण्यात आले होते.
अधिक वाचा : जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...
करोडोंची संपत्ती
एम करुणानिधी यांनी तीन विवाह केले होते. त्यांनी आपल्या तीनही पत्नींच्या नावाने सर्वात जास्त संपत्ती गोळा केली होती. एकेकाळी ते दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैंकी एक होते. उल्लेखनीय म्हणजे, डीएमके नेते करुणानिधी यांच्या नावावर ना घर, ना गाडी... किंवा त्यांच्या नावावर एखादी जमीनही नाही... परंतु, २०१६ मध्ये सादर केलेल्या घोषणापत्रानुसार, त्यांची आणि पत्नींची एकूण संपत्ती होती ६२ कोटी, ८३ लाख, ३३ हजार २५३ रुपये... यातील चल संपत्ती ५८ लाख ६१ हजार २५३ रुपये तर स्थायी संपत्ती ४ कोटी २२ लाख ३३ हजार रुपये इतकी होती. करुणानिधी यांच्या एका बँक अकाऊंटमध्ये १३ करोड ३१ लाख ७९ हजार ४५६ रुपये होते... २०१६ च्या निवडणुकीनंतर आलेल्या एडीआर अहवालात या आकड्याचा उल्लेख करण्यात आलाय.
अधिक वाचा : ... म्हणून करूणानिधी नेहमी काळा चष्मा घालायचे !
अंत्यसंस्कारावरून वाद
डीएमके पक्षाचे नेते करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. पण त्यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद निर्माण झाला होता. करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी त्यांच्या कुटुंबियांची आणि कार्यकर्त्यांनी केली. करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने वाद निर्माण झाला. मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर आता करुणानिधींच्या अत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला आहे. मरिन बीचवरच करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अधिक वाचा - एम करुणानिधी यांना मुखाग्नी नाही तर दफन केलं जाईल, का ते जा
बंदोबस्तात वाढ
दरम्यान, द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.