भोपाळ : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने देश ढवळून निघाला असताना मध्यप्रदेशमध्येही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. खरगौनमधील झिरन्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीने मुलीवर अत्याचार झाला. 


बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अल्पवयीन मुलगी आपल्या भावाबरोबर शेतीची राखण करण्यासाठी आली होती. शेताची राखण करणाऱ्या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. पाणी पिण्याच्या बहाण्याने आरोपी शेतावर आले होते. भावाला मारहाण करत ओपींनी त्याच्या बहिणीला पळवून घेऊन गेले आणि अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.   



दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील गरीब तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच राज्यातील बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघा तरूणांनी तिच्यावर बलात्कार केला. ते एवढ्यावर न थांबता तिची तिची पाठ आणि पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे. पिडित तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिले. परंतु त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


6\