पत्नीचे तोंड, डोळे फेवी क्विकने चिकटविले, त्यानंतर गळा दाबला
पत्नीने आरडाओरड करु नये म्हणून चिडलेल्या पतीने तिचे डोळे, तोंड आणि नाकात फेवी क्विक टाकले. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.
विदिशा : मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीने आरडाओरड करु नये म्हणून चिडलेल्या पतीने तिचे डोळे, तोंड आणि नाकात फेवी क्विक टाकले. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.
ही घटना विदिशा येथील राजपूत कॉलनीमध्ये घडल्याचे पुढे आलेय. दुर्गा कुशवाह (३४) हिची हत्या हल्के पती कुशवाह याने केली. दुर्गाशी त्यांचे भांडण झाले आणि रागाच्या भरात तिचा खून केला. त्याच्या मुलाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हत्येनंतर गुन्हेगार पती फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही कारणांवरून भांडण झाले होते, भांडणात रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्याच दतिया जिल्ह्यात एका पतीने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा कारणाने पत्नीवर गोळी झाडली होती.