Madhya Pradesh Crime : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटेनमुळे देश हादरला आहे. देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशात मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे.भर दिवसा भर रस्त्यात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरुन जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तसेच याचा व्हिडिओ व्हायरल केला. पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मात्र, बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्जैनच्या कोयला फाटक परिसरात भर दिवसा एक महिलेवर रस्त्यावरच बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी आरोपी  मोहम्मद सलीम याला पोलिसांनी अटक केली आहे. सलीम हा प्रकाश नगर नागदा  परिसरात राहतो. सलीम हा रिक्षाचालक आहे. 4 सप्टेंबर  तो उज्जैनच्या कोयला फाटक परिसरातूबन जात असताना एक व्यक्ती रस्त्यावरच महिलेवर बलात्कार करत असल्याचे त्याने पाहिले. मात्र, त्याने महिलेची मदत न करता या घटनेचा व्हिडिओ बनवला.


व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला


मोहम्मद सलीम बलात्कार होतानाचा व्हिडिओ बनवून अवघ्या अर्ध्या तासातच याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांच्या पर्यंत पोहचला. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणारा आरपी मोहम्मद सलीम याला ताब्यात घेतेल. पोलिसांनी मोहम्मद सलीम याचा  मोबाईल तपासला असता पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये बलात्काराचा व्हिडिओ सापडला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम विरोधात  भारतीय दंड संहिता कलम 72, 77, 293, आयटी कायद्यासह विविध कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक का नाही?


पोलिसांनी व्हिडिओ बनवणारा आरोपी मोहम्मद सलीम याला अटक केली असली तरी बलात्कार करणारा आरोपी लोकेश याला अटक केलेली नाही. व्हायरल व्हिडिओच्या पोलिसांनी लोकेश याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले. लोकेश हा भाजी विक्रेता आहे. तर, पीडित महिला रस्त्यावर कचरा गोळा करते.   पीडित महिलेची साक्ष नोंदवण्यात आली. लोकशे याने लग्नाचे अमिश दाखवून माझ्याशी शरीर संबध बनवले असे महिलने पोलिसांना सांगितले. मात्र, महिलेने लोकेश विरोधता कोणतीही तक्रार केलेली नाही. यामुळे बलात्कार करणारा आरोपी लोकेश याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.