जबलपुर : गेल्या आठवड्यात झालेल्या फ्रेंडशीपडेला एक अजब घटना समोर आली.  एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांवर पैशांची बरसात केली. त्याने आपल्या वडिलांचे ४६ लाख रुपये मित्रांना वाटले. एका मजदूराच्या मुलाला १५ लाख तर होमवर्कला मदत करणाऱ्या आपल्या क्लासमेटला ३ लाख रुपये दिले. त्याच्या या पैशांतून मित्राने एक कार खरेदी केली.


६० लाख हरवले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बिल्डरचा मुलगा दहावीत शिकतोय. त्याने कधीच आपल्या मित्रांना खाली हात पाठवले नाही. त्याच्या शाळा आणि क्लासमध्ये मिळून ३५ मित्र होते. या सर्वांना त्याने स्मार्टफोन आणि चांदीचे ब्रेसलेट गिफ्ट केले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरने आपल्या कबर्डमध्ये ६० लाखाची कॅश ठेवली होती. नुकत्याच झालेल्या प्रॉपर्टी विक्रीतून त्याला ही रक्कम मिळाली होती. पैसे गायब झाल्याचे कळताच त्याने पोलिसांत तक्रार दिली. चोरी किंवा लुटमारी झाली नसताना पैसे गायब होण्याच्या घटनेने पोलिसही संभ्रमात होते.


पैसे रिटर्न घेण्यास सुरूवात 


जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा मुलाने आपल्या मित्रांमध्ये पैसे वाटल्याचे समोर आले. मित्रांकडून पैसे परत घेण्याचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत. मुलाच्या मित्रांची यादी वडीलांनी पोलिसांना दिलीयं. १५ लाख मिळाल्यानंतर मजदूराचा मुलगा गायब आहे. ज्या मित्रांकडे जास्त रक्कम आहे त्यांच्या आईवडिलांना पोलिसांनी बोलावून घेतलंय.


त्यांना पाच दिवसाच्या आता पैसे परत करण्यास सांगितलंय. आतापर्यंत १५ लाख रुपये रिटर्न मिळाल्याचे एसआयबीएस तोमर यांनी सांगितले. याप्रकरणी कोणती तक्रार दाखल करण्यात आली नाही. कारण यामध्ये सर्वजण अल्पवयीन आहेत.