मध्य प्रदेश : पालिका निवडणुकीत भाजप-काँग्रेसला ९-९ जागा, शिवराजसिंग चौहान यांना फुटला घाम
मध्य प्रदेशमधील १९ पालिका निवडणुकीची आणि नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. यावेळी धक्कादायक निकाल हाती आला.
भोपाळ : मध्य प्रदेशमधील १९ पालिका निवडणुकीची आणि नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. यावेळी धक्कादायक निकाल हाती आला.
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना यांनी या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. अनेक रोड शो केले. मात्र, असे असूनही भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चौहान यांना मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात १९ नगर पालिका आणि नगर परिषद अध्यक्ष पदांच्या निवडणुकीत ९-९ जागा भाजप आणि काँग्रेसने विजय मिळवलाय. एका ठिकाणी भाजपकडून बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदावाराने विजय मिळवलाय. ६ नगर पालिका निवडणुकीत भाजपला दोन ठिकाणी विजय मिळवता आला आहे. तर ४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवत मुसंडी मारली.
१३ नगर परिषद जागांपैकी भाजपने ७ तर काँग्रेसने ५ जागांवर विजय मिळवलाय. एक जागा अपक्षाने जिंकली आहे.