लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?
मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
नवी दिल्ली : मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ, खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिलीये. गेल्या १० वर्षांत राज्याची लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढलीये. असं असताना मतदारांच्या संख्येत मात्र ४० टक्क्यांची वाढ झालीये. एकेका मतदाराचं नाव २६ याद्यांमध्ये असल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय. भाजप आणि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी निवडणुका जिंकण्यासाठी हे घडवून आणल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.