Padma Awards 2023: केंद्र सरकारने 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये यंदाच्या वर्षी एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश होता. या सन्मानानंतर त्या त्या सन्मानित व्यक्तीचे कार्य उजेडात येत आहे. अशाच एका रूग्णसेवेचा वसा उचललेल्या डॉक्टराचा पद्मश्री पुरस्कार (Padma Shri) देऊन सन्मान करण्यात आलाय. नेमकं त्यांचे रूग्णसेवेतले कार्य काय आहे? ते जाणून घेऊयात.


रूग्णांवर 20 रूपयात उपचार करायचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील डॉ. एम.सी. दावर (77 वर्षीय) (MC Davar) यांचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. डॉ. दावर यांनी रूग्णावर सवलतीत उपचार केले होते. केवळ 20 रूपये घेऊन ते प्रत्येक रूग्णांवर उपचार करायचे. हि त्यांची रूग्णसेवा खुप महान होती. त्यामुळे सरकारतर्फे त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. 


कोण आहेत डॉक्टर?


डॉ. एम.सी. दावर (MC Davar) यांचा जन्म 16 जानेवारी 1946 रोजी पाकिस्तानमध्ये झाला. देशाच्या फाळणीनंतर ते भारतात आले होते.  डॉ. दावर यांनी जबलपूर येथून एमबीबीएसची पदवी घेतली होती.तसेच 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी सुमारे एक वर्ष भारतीय लष्करात सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी नाममात्र शुल्कात रूग्णसेवा सुरु केली होती. केवळ 20 रूपयात ते रूग्णावर उपचार करायचे. यामुळे अनेक गरीब रूग्णांवर सवलतीत उपचार झाले.त्यांच्या याच रूग्णसेवेच्या कार्याची दखल आता सरकारने घेतली आहे. 


डॉक्टरांची प्रतिक्रिया


उशिरा का होईना, मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. लोकांच्या आशीर्वादानेच मला हा पुरस्कार मिळाला आहे, असे डॉ दावर (MC Davar) यांनी पद्मश्रीसाठी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, "इतकी कमी फी घेण्याबाबत घरात चर्चा नक्कीच झाली होती, पण त्यात वाद नव्हता. आमचा उद्देश फक्त जनतेची सेवा करणे हा होता, त्यामुळे आम्ही फी वाढवली नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच मूळ मंत्र असा आहे की जेव्हा तुम्ही संयमाने काम करता, तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळते आणि यशाचा मान मिळतो,असे त्यांनी सांगितले. 


 "आम्हाला वाटायचे की पुरस्कार फक्त राजकीय ओळखीमुळेच दिले जातात, पण सरकार ज्या प्रकारे तळागाळात काम करणाऱ्यांना ओळखून त्यांचा सन्मान करत आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि आमच्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.दावर (MC Davar) यांचा मुलगा ऋषी याने दिले आहे. 


दरम्यान डॉक्टरांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारानंतर (Padma Shri) त्यांची मध्य प्रदेशमध्ये एकच चर्चा आहे.