मध्य प्रदेशात बहुमताची `भाजपा-काँग्रेस`ला गुगली
मध्य प्रदेशात आता जल्लोष कुणी करायचा आणि सत्ता स्थापनेसाठी बैठक कुणी घ्यायची हाच प्रश्न सुटत नाहीय. कारण प्रत्येक २० मिनिटांनी येथील परिस्थिती बदलतेय.
भोपाळ : मध्य प्रदेशात आता जल्लोष कुणी करायचा आणि सत्ता स्थापनेसाठी बैठक कुणी घ्यायची हाच प्रश्न सुटत नाहीय. कारण प्रत्येक २० मिनिटांनी येथील परिस्थिती बदलतेय. काही वेळापूर्वी भाजपाने, काँग्रेसला मागे टाकत बहुमताचा आकडा गाठला होता. पण आता पुन्हा परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसने आता पुन्हा एकदा बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेसचा आकडा ११५ वर आला आहे, तर भाजपा १०३ जागांवर आहे, तर इतर आमदारांची संख्या ११ वर आली आहे. मध्य प्रदेशात काही वेळापूर्वी भाजपा बहुमताच्या जवळ आला होती. पण आता पुन्हा काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या कार्यालयासमोर जल्लोष सुरू होता. कमलनाथ यांच्या घरी मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित करण्यासाठी बैठक सुरू होती. याच दरम्यान काँग्रेसचा आकडा घसरला आणि भाजपाने बहुमताचा आकडा गाठल्याची बातमी आली. बैठक थंडावली, काँग्रेस कार्यालयासमोर पुन्हा निराशा आणि चेहऱ्यांवर प्रश्नचिन्हं दिसायला लागली.
दुसरीकडे मध्य प्रदेश भाजपात पुन्हा उत्साह दिसायला लागला. कारण भाजपाने बहुमताचा आकडा पुन्हा गाठला होता. यानंतर भाजपाने सत्ता स्थापनेसाठी इतर समर्थक आमदारांची चाचपणी सुरू केली, पण पुढच्या १५ मिनिटात पुन्हा चित्रं बदललं आणि काँग्रेसने बहुमताचा आकडा ११५ गाठला आणि भाजपा १०४ वर आली.
इतर आमदारांची संख्या ११ वर आहे. आता आणखी काय चित्र बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण आता काँग्रेसचा आकडा घसरण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातंय.
निकाल LIVE पाहा http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा.