नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने जोरदार झटका दिल्याचं पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील राघौगढ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवार आरती शर्माने भाजपच्या मायादेवी अग्रवाल यांचा पाच हजार मतांनी पराभव केला आहे.


राघौगढमध्ये काँग्रेसने आपलं वर्चस्व निर्माण करत २० वॉर्ड्समध्ये विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रचार केल्यानंतरही भाजपला २४ पैकी केवळ चारच वॉर्डमध्ये विजय मिळवता आला आहे. 


राघौगढमध्ये १७ जानेवारी रोजी निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांचे शनिवारी निकाल समोर आले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार आरती शर्मा यांनी ५ हजार ६१२ मतांनी भाजपच्या माया अग्रवाल यांचा पराभव केला आहे. 


या जागांवर पार पडल्या निवडणुका


धार जिल्ह्यातील धार, मनावर, पीथमपुर, सरदारपुर, राजगढ, धरमपुरी, धामनोद, कुक्षी आणि डही या जागांवर मतदान पार पडलं. बडवानी जिल्ह्यातील बडवानी, सेंधवा, पानसेमल, खेतिया, पलसूद, अंजड आणि राजपुर या मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर, खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर, गुना, राघौगढ, विजयपुर आणि नूपपुर जिल्ह्यातील जैतहरी नगरपरिषदेसाठी मतदान पार पडलं.


यासोबतच ७,०३५ पंच, १६८ सरपंच, १७ जनपद पंचायत सदस्य आणि तीन जिल्हा पंचायत सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. 


मुंगावली आणि कोलारसमध्ये २४ फेब्रवारी रोजी पोटनिवडणूक


मध्य प्रदेशातील अशोकनगरमधील मुंगावली आणि शिवपुरीमधील कोलारस विधानसभा क्षेत्रात २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.


मध्य प्रदेशात याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६५, काँग्रेसने ५८, बीएसपीने चार आणि इतरांनी तीन जागांवर विजय मिळवला होता.