ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इथं बॅट उंचावली अन् तिथे भाजप कार्यकर्त्याचं डोकं फुटलं... मध्य प्रदेशातील प्रकार
Jyotiraditya Scindia : जखमी झाल्यानंतर कार्यकर्त्याला मंत्र्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः रुग्णालयात पोहोचत कार्यकर्त्याची विचारपूस केली.
Madhya Pradesh : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याच्या शैलीमुळे कायमच चर्चेत असतात. विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होतात. कोणतीही स्पर्धा असो की क्रिकेटचे (Cricket) मैदान ज्योतिरदित्य सिंधिंया कुठेही मागे राहत नाहीत. मात्र इंदूरमध्ये (indore) क्रिकेट खेळताना त्यांच्या एका शॉटमुळे भाजप (BJP) कार्यकर्त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. यानंतर सिंधिया यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्या कार्यकर्त्याची चौकशी केली आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (MCA) बांधलेल्या क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया बुधवारी रीवा येथे आले होते. स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियां तेथे एक सामनाही खेळले. बॅट धरून सिंधियां हे मोठ्या उत्साहात थेट खेळपट्टीवर उतरले आणि असा फटका मारला की चेंडू थेट भाजपच्या कार्यकर्त्याला डोक्यावर लागला. चेंडू लागल्याने भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत सिंधिया रीवा दौऱ्यावर आले होते. रीवा विमानतळाच्या पायाभरणीनंतर मुख्यमंत्री जबलपूरमार्गे भोपाळला परतले. त्यांनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) नव्याने बांधलेल्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन केले. यानंतर स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा सिंधिया उरतले. यावेळी बॅट हातात धरून त्यांनी जोरदार फटका मारला. पण तो चेंडू भाजपचा कार्यकर्ता असलेल्या विकास मिश्रा यांच्या डोक्याला लागला.
झेल टिपण्याच्या प्रयत्नात विकास मिश्रा यांच्या डोक्याला मार लागला. यामुळे विकास जखमी झाले आणि त्यांच्या तोंडातूनही रक्त येऊ लागले. यानंतर मिश्रा यांना तातडीने सिंधिया यांच्या गाडीतून संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर मिश्रा यांना टाके पडल्याचे समोर आले आहे. यानंतर सिंधिया यांनी इतर नेत्यांसह रुग्णालय गाठत मिश्रा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.