Corona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी `तो` थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Madhya Pradesh News : तो दोन वर्ष कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर शहारे येतात. निशब्द आकाश, चार भिंतीत कोंडलेलं आयुष्य, दाराबाहेर भयाण शांतता आणि ॲम्बुलन्सचा ककर्श आवाज...लोकलच्या वेळापत्रकावर धावणारी मुंबईही देखील शांत झाली होती. या कोरोनाच्या लाटेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. कोणाचे वडील कोणाची आई, भाऊ, बहीण, नवरा कोणी ना कोणी नातेवाईक गमावला. हसतं खेळतं कुटुंब आज भयाण शांतेत जगतंय कारण आज तिच्या चौघा लोकांच्या घरात ती एकटी राहिली होती.
कोरोनाने अख्खा देशात अराजकता माजवला होता. रुग्णालयात मृतदेहाचे खच पडले होते. अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. सगळ्या दु:खत आणि मनाला सल लावणारी गोष्ट म्हणजे आपल्या माणसाचं शेवटचं दर्शनही घेता येतं नव्हतं. रुग्णालय कर्मचारीचं त्यांचं अत्यसंस्कार करायचे....
नशिबाने खेळ मांडला!
2021 मध्ये जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा कोरोना बळींची संख्या वाढली होती. या वेळी 30 वर्षीय कमलेशलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण काही दिवसांनी तिच्या बायकोला त्याची मरणाची बातमी मिळाली. रुग्णालयानेच त्याचावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे कुटुंबाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही.
अन् दोन वर्षांनी तो आला...
तो गेला...घराचा आधार गेला...तिच्या वरील सावली हरपली...कशीबशी ही विधवा आयुष्य त्याचा आठवणीत काढत होती. एक एक दिवस काढणे जड जात होते पण जगावत लागतं ना...तिही जगत होती...असं करता करता दोन वर्ष उलटली...एकेदिवशी दारावर बेल वाजली तिने दार उडलं...
अन्...डोळ्यांवर तिच्या तिलाच विश्वास बसत नव्हता. ज्याची विधवा म्हणून जग होती तो नवरा दारात उभा होता. ज्या मुलाचं अत्यसंस्कार करता आलं नव्हतं तो मुलगा घरी आला होता. आनंदाच्या धक्काने प्रत्येकाचा डोळ्यात फक्त अश्रू होते...
तो मरण पावल्या नव्हता तर मग...
कमलेश दोन वर्षांनी घरी आला होती. या दोन वर्षात नक्की त्याचा सोबत काय झालं होतं हे ऐकून सगळ्यांचा पायाखालची जमीनच सरकली. कमलेशला एका टोळीने ओलीस ठेवलं होतं. त्याला दररोज औषधं आणि इंजेक्शन दिली जातं होती. तो कसाबसा त्यांचा तावडीतून सुटून आला. त्याची प्रकृती बरी नसून तो शॉकमध्ये आहे.
कुठली आहे ही घटना?
ही घटना मध्य प्रदेशातील धार इथली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागही बुचकळ्यात पडलं आहे. त्यावेळी मृतदेह बदलण्याचे अनेक प्रकार समोर आले होते. दरम्यान एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे.