Car sticker Viral Video: नवीन वस्तू अथवा वाहन घेतल्यानंतर सामान्यपणे त्यावर स्टीकर्स लावण्याची पद्धत अनेकजण फॉलो करतात. बऱ्याच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचे स्टीकर्स पाहायला मिळतात. बरं हे स्टीकर्स वायफळ असतात असं नाही. हल्ली तर अनेक गाड्यांमध्ये 'बेबी ऑन बोर्ड', 'पॉस ऑन बोर्ड' यासारखे स्टीकर्सही दिसून येतात. अनेकदा आपल्याला रिक्षांच्या मागे कोणत्या बँकेने आर्थसहाय्य केलं आहे याची माहितीही पाहायला मिळते. तर बरेच हौशी लोक डॅड्स गिफ्ट, आईचा आशिर्वाद वगैरेसारखे वन लायनर्स गाडीवर आवर्जून चिटकवतात. मात्र या स्ट्रीकर्स लावण्यामागील नेमकी भावना ही कृतज्ञता व्यक्त करण्याची असते. असेच एक भन्नाट स्टीकर सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झालं आहे.


काय आहे या व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर सद्दाम पटेल नावाच्या युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मारुती-सुझुकीची एस क्रॉस कार दिसत आहे. या गाडीच्या मागील बाजूस टेल लाईटजवळच्या भागात एक भन्नाट स्टीकर लावले दिसत आहे. या स्टीकरमध्ये एक म्हशीची आकृती दिसत आहे. 'भैंस कि देन' असं लिहून म्हशीवर 'रानी' असं लिहिलेलं आहे. म्हणजेच ही कार रानी नावाच्या म्हशीची देणगी असल्याचं या स्टीकरमधून अधोरेखित करण्यात आलं आहे. दुधाच्या व्यापारातून झालेल्या पैशातून मिळालेला नफा वापरुन ही कार मालकाने खरेदी केल्याचं या स्टीकरवरुन स्पष्ट होत आहे. नंबर प्लेटवरुन या कारची नोंदणी मध्य प्रदेशमधील असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच रानी म्हशीवर तिच्या मालकाचं फार प्रेम असल्याचंही स्टीकरवरुन दिसतंय अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. ही कार फारच नवी आहे. 


मजेदार प्रतिक्रिया


लोकांना हा म्हशीचा स्ट्रीकर फारच आवडला आहे. व्हिडीओवर शेकडोच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओला 1 लाख 76 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. 'ही गाडी म्हशीचं दूध विकून घेतलीय की म्हैस विकून?' असा प्रश्न एकाने विचारलाय. 'हा फार चांगला विचार आहे. मी या कारमालकाचं नक्कीच कौतुक करेन,' असं अन्य एकाने म्हटलं आहे. 'कारसाठी म्हैस विकली की काय?' असा मजेदार प्रश्न एकाने विचारला आहे. 'तुमच्या रानीला आमचा नमस्कार सांगात,' 'इंदूर जिल्ह्यातील लोक काहीही करु शकतात', 'मी पण म्हैस विकत घेणार आणि दूध विकून बाईक खरेदी करणार,' अशा प्रतिक्रियाही लोकांनी नोंदवल्यात.



एकाने तर आमची म्हैस एवढी खर्चिक आहे की तिच्यामुळे आम्हाला गाडी विकावी लागली अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. बऱ्याच जणांनी हा खरा शेतकरी असून त्याला प्राण्यांच्या योगदानाची जाण असल्याचं म्हटलं आहे.