भोपाळ : आज 21व्या शतकातदेखील भारतामध्ये सती मंदिराचे अस्तित्त्व आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडवानी जिल्ह्यातील सेंधवा किल्ल्यावर सतीचे मंदिर आहे. देशामध्ये सती प्रथेवर बंदी असल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याविरूद्ध आवाज उठवला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 12 ठिकाणी तक्रार केली आहे. मात्र मंदिर निर्माण समितीने आरोपांचे खंडन करत सती प्रथेचा विरोध करत असल्याचे सांगण्यात आले आहे. 


प्राण प्रतिष्ठा 


मंगळवारी सेंधवा किल्ल्यामध्ये सती माता मंदिरात प्राण प्रतिष्ठेचे विधी पार पडले. त्याकरिता भव्य आयोजन करण्यात आले होते. राजस्थानच्या झुंझुनूमधील मातेच्या भव्य मंदिरावरून प्रेरणा घेऊन या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.  


कशी झाली सुरूवात ?  


सात वर्षांपूर्वी जेव्हा मंदिर पाहिले होते तेव्हा तेथे ज्योत पेटली होती. आम्ही सती प्रथेला चालाना देण्याऐवजी घराघरामध्ये हिंदू धर्माची ज्योती तेवत ठेवण्यासाठी काम करत आहोत.  


तक्रार केली दाखल  


राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अन्य 12 ठिकाणी तक्रार करण्यात आली आहे. सती या प्रथेला कायदेशीररित्या परवानगी नाही. अशाप्रकारचे मंदिर बनण्याआधीच त्याला रोखण्यासाठी तक्रार केली आहे. तक्रार करूनही प्रशासकीय अधिकारी कारवाई करत नसल्याचेही अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सांगितले आहे.