मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. तीन मैत्रिणी शाळा बुडवून फिरण्यासाठी इंदौरला (indore) गेल्या आणि त्यांनी तिथे विष (poison) प्राशन केले. तिन्ही मुली बारावीच्या विद्यार्थिनी होत्या. विष प्राशन केल्यानंतर तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. एका मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तीन मुलींनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Socail Media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, तिन्ही मुली हातात डझनभर सल्फासच्या (Salfas) गोळ्या घेतल्या आहेत. तसेच, त्या व्हिडिओमध्ये बाय-बाय करताना दिसत आहे. तिन्ही मुली आत्महत्या करण्यापूर्वी हसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (madhya pradesh three schoolgirls end life after ate sulfas tablets video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे संपूर्ण प्रकरण?


तिन्ही मैत्रिणी सिहोर येथील आष्टा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इंदौरच्या प्रादेशिक उद्यानात या तिघींनी विष प्राशन केले. या तिन्ही मुली शुक्रवारी बसने इंदौरला पोहोचल्या होत्या. तिघांपैकी दोघींचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.


आष्टा येथील मॉडेल स्कूलमध्ये शिकणाऱ्या तिन्ही मैत्रिणी इंदौरला गेल्या होत्या. त्यातील एक मुलगी तिच्या मित्राला भेटायला आली होती. पार्कमध्ये आल्यानंतर मुलीने त्या मित्राला भेटायला बोलावले पण तो त्यांना भेटायला आला नाही आणि त्याने घरी परत जा असे सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचा राग येऊन त्या मुलीने विष प्राशन केले.


दुसरीकडे, दुसऱ्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबातील भांडणामुळे नाराज होती. मैत्रिणीला विष घेताना करताना पाहून तिनेही विष घेतले. आपल्या दोन मैत्रिणींना विष खाताना पाहून तिसरी मैत्रिण घाबरली. घरी गेल्यावर काय उत्तर देणार या भीतीने तिसऱ्या मुलीनेही विष प्राशन केले. यातील आधी विष घेतलेल्या मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे.


दरम्यना, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नगर परिसरातील प्रादेशिक उद्यानात ही घटना घडली. तिन्ही मुलींनी सायंकाळी 7.30 च्या सुमारास विष प्राशन केले. सुमारे अर्ध्या तासानंतर तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस तिन्ही मुलींचे फोन कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.