Harda Blast Madhya Pradesh Latest News: मध्यप्रदेशमधल्या हरदा (Harda) इथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला, त्यानंतर कारखान्याला आग लागली यात सहा जणांचा मृत्यू झाल आहे. तर जवळपास 40 जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यात आणखी काही लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की आकाशात दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार हरदातल्या मगरधा रोडवरच्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटानंतर (Blast) आग लागली. आगीने भयंकर रुप धारण केलं. आसपासच्या अनेक घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. फटाका कारखान्याला लागलेल्या आगीमागे घातपात आही की अपघात याचा पोलीस शोध घेत आहेत. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी आसपासच्या परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. 


अपघात की घातपात?
मध्यप्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यातील बैरागढ परिसरातील मगरधा रोडजवळच्या एका निवासी वस्तीत बेकायदेशी फटाका कारखान चालवला जात होता. त्यामुळे स्फोटानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. भर वस्तीत इतकी मोठा बेकादेशीर फटाखा कारखाना सुरु असतानाही प्रशासनाची नजर त्यावर कशी पडली नाही. 2015 मध्ये मध्य प्रदेशच्या झबुआमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी तब्बल 80 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदमध्ये सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये स्फोट झाला होता. या हॉलेलच्या जवळच एका गोदामात स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता. सकाळची वेळ असल्याने परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हॉटेलमध्ये स्फोट झाल्यानंतर गोदामातील स्फोटकांनी पेट घेतला आणि बघता बधता संपूर्ण परिसर बेचिराख झाला.


हरदातही भीषण स्फोट
हरदातही झाबुआ सारखीच घटना घडील आहे. आगीने भीषण रुप धारण केलं अअसून आसपासची अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. कारखान्यात अनेक लोकं काम करत होती. आगीमुळे ती आतमध्येच अडकली आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की त्याच्या आवाजाने आसपासच्या परिसरातील घरांनाही हादरे बसले. 


मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपातकालीन बैठक
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपातकालीन बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी मंत्री उदय प्रताप सिंह, एसीएस अजीत केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना तात्काळ हेलीकॉप्टरने घटनास्थळी देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय भोपाळ आणि इंदोरमझल्या मेडिकल कॉलेज आणि एम्समध्ये बर्न युनिटला सज्ज राहाण्यास सांगण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंदोर आणि भोपाळमधल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थानी पाठवण्यात आल्या आहेत.